८/०३/२०२४

चवळीचे वडे आणि थालीपीठ

 

#चवळीचे _वडे_आणि_थालीपीठ




वृद्धापकाळामुले आमचे दोघांचेही आहार आता अगदीच तोळामासा  झाले असल्यामुळे काल रात्री जेवणात केलेली गांवरान चवळची वाटीभर उसळ शिल्लक राहिली होती.

मग आज सकाळी मी पत्नीला सुचवले की ती  चवळीची उसळ रसा सकट मिक्सरवर फिरवून घे आणि त्यात चवीनुसार तिखट,मीठ,चिरलेला कांदा, बेसन पीठ आणि भाजणी घालून व आवश्यक असेल तर थोडेसे पाणी घालून वडे किंवा थालीपीठ साठी पीठ भिजवून  ठेव.

नंतर त्या पिठाचे तव्यावर दोघांच्या नाष्ट्यासाठी एक मोठे थालीपीठ लाव आणि उरलेल्या पिठाचे आकाढाईत तेल तापवून वडे तळून काढ.

साहित्य :  एक वाटीभर चवळीची रसदार उसळ,  दोन टेबक सपून बेसन पीठ,एक वाटी भाजणी (थालिपीठाची),एक मध्यम आकाराचा कांदा (चिरलेला),चवीनुसार तिखट,मीठ,लिरे पूड,तीळ, जरुरीनुसार तेल

कृती : प्रथम चवळीची उसळ रसा सकट मिक्सरवर फिरवून घेऊन त्यात चवीनुसार तिखट,मीठ,चिरलेला कांदा, बेसन पीठ आणि भाजणी घालून व आवश्यक असेल तर थोडेसे पाणी घालून वडे किंवा थालीपीठ साठी पीठ भिजवउण ठेवा.

एका तव्यावर चमचाभर तेल घालून त्यावर मध्यभागी भिजवलेल्या पिठाचा गोळा ठेवा आणि हाताने थापून थालीपीठ  बनवा. मध्यभागी बोटाने एक भोक पाडून त्यात तेल सोडा. तवा गॅसवर ठेऊन दोन्ही बाजूंनी थालीपीठ खानग भाजून घ्या.

चवळीचे खमंग थालीपीठ लोणी, दह्यासोबत किंवा खाराची मिरची आगर आंब्याचे लोणचे या बरोबर खायला द्या.

चवळीचे वडे : गॅसवर एका कढईत तेल तापायला ठेवा. तेल चांगले तापल्यावर ,भिजवलेल्या पिठाचे लाडवा एव्हढ्या   आकाराचे वडे तापलेल्या तेलात सोडून सोनेरी रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढा.

चवळीचे चटकदार वडे कोथिंबीर-ओल्या खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search