काल रात्रीच मी मनांत ठरवले की उद्या (आज) सकाळच्या नाष्ट्यासाठी आपण नेहमीचेच दही-वडे ,पण जरा निराळ्या पद्धतीने करायचे.
निराळी पद्धत म्हणजे दही वड्यांचे वडे नेहमीसारखे तेलात डिप फ्राय न करता , इडलीपात्रातून वाफवून घ्यायचे. म्हणजे तेल विरहित होतील.
मग मी पत्नी ला सगळी कृती नीट समजावून सांगितली व तिने रात्रीच दोन्ही डाळी भिजत घालून ठेवल्या.
आज सकाळी मिक्सरमधून दोन्ही डाळींचे वड्यांचे वाटण बनवून घेतले आणि दही सुद्धा बनवले व नंतर इडली पात्रातून वडे/इडल्या वाफवून घेतल्या आणि आगोदर पाण्यात घालून नंतर दह्यात मुरवून घेतल्या.
त्याच इडली दही वड्यांची ही रेसिपी मी येथे तुमच्यशी शेअर करत आहे.
दही इडली-वडे
साहित्य : उडीद डाळ ,त्याच्या निम्मी मूग डाळ . चार वाट्या दही ,साखर, आले, मिरच्या,कोथिंबीर,जिरे, मोहरी, मीठ,कढीपत्त्याची पाने,सुक्या लाल मिरच्या, तूप, इडलीपात्र
कृती : आदल्या दिवशी रात्री उडीद डाळ आणि मूग डाळ स्वतंत्र बाऊल्स मध्ये भिजत घालून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही डाळी चाळणीवर उपसून व पाने निथळून मिक्सरच्या भांड्यात आघालून त्यात मीठ,मिरच्या,आल्याचा तुकडा ,थोडीशी कोथिंबीर व कढी पत्त्याची काही पाने घालून मिक्सरमधून वाटून घ्या आणि बाऊल मध्ये काढून ठेवा.
आता दह्यात साखर,चवीपुरते मीठ,आल्याचे वाटण,जिरे पूड,कोथिंबीर घालून लाकडी रविणे चांगले घुसळून घ्या.
गॅसवर एका काढल्यात तूप तापवून घ्या आणि त्यात जिरे,मोहरी,काढीपत्याची पाने,चिरलेली कोथिंबीर आनर लाल सुक्या मिरच्या घालून ती तडका फोडणी दह्या वर ओटा आणि मिक्स करून घ्या. आता त्यावर उरलेली चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आपले वाड्यासाठीचे दही तय्यार झालयं.
आता गॅसवर इडली पात्रात पाणी घालून ते तापत ठेवा. पाणी उकळू लागले की इडलीच्या साच्याला तेलाचा हात लावून त्यात चमच्याने वड्यांचे पइथ घाला आणि इडली पात्राला झाकण लावून १५ मिनिटे वाफवून घ्या. थोडेसे गार झाले की झाकण काढून एका सुरीला तेलाचा हात लावून त्या सूरीने वाफावलेले वडे (इडल्या) साच्यातून सोडवून का बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात टाका.
१५ मिनिटांनी इडली /वडे पाण्यातून काढून आपण बनवून ठेवलेल्या दह्यात टाकून १५-२० मिनिटे मुरायला ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा