८/११/२०२४

डोसा रेडीमिक्स

 

 

डोसा रेडीमिक्स  

 





 

 

डोसे सगळ्यांनाच आवडतात. डोसा न आवडणारी व्यक्ती विरळाच. पण बऱ्याच लोकांना घरी डोसे बनवता नाही येत. शिवाय डोसे बनवण्याची पूर्वतयारी वेळखाऊ असते,त्यामुळे ते दरवेळी जमेलच असे नसते.

अशा लोकांची ही अडचण ध्यानांत घेऊनच  मी आज त्यांच्यासाठी ही डोसा रेडीमिक्स ची रेसिपी येथे शेअर करत आहे.

एकदा का तुम्ही हे  डोसा रेडीमिक्स बनवून ठेवलेत ,की जेंव्हा मनांत येईल तेंव्हा अर्धा तास आधी हे रेडीमिक्स डोसा पीठ तुम्ही त्यात एक वाटी रेडी मिक्स ला अर्धी वाटी दही घालून भिजत टाकले की अर्ध्या तासात डोशाचे बॅटर तयार होईल.

डोसा रेडीमिक्स साठी  लागणारे साहित्य :  एक वाटी उडदाची डाळ,दोन टेबलस्पून हरभरा (चणा) डाळ , अर्धा चमचा मेथी दाणे,एक वाटी जाड पोहे,तीन वाट्या तांदूळाची पिठी,एक चमचा पिठी साखर,अर्धा चमचा मीठ.  

कृती : गॅसवर एका कढईत मंद आंचेवर आगोदर हरभरा (चणा) डाळ,नंतर उडीद डाळ ५ मिनिटे भाजून घ्या नंतर त्यात मेथी दाणे घालून आणखी १-२ मिनिटे भाजून घ्या शेवटी जाड पोहे घालून आणखीन २ मिनिटे भाजून घेतल्यावर गॅस बंद करा आणि मग मीठ आणि साखर घालून ठेवा.

थंड झाल्यावर ही सगळे मिक्सरवर फिरवून पावडर बनवून घ्या. मग एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीत ही पावडर काढून  घ्या आणि त्यात तांदूळाची पिठी चांगली मिक्स करा आणि ही डोसा रेडीमिक्स घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा बरणीत भरून ठेवा.

रेडी मिक्स पावडर वापरुन डोसे बनवण्याची कृती :

एक वाटी डोसा रेडी मिक्स पावडर साठी  अर्धा वाटी दही व पाणी घालून भज्यासारखे पीठ बनवून अर्धा तास मुरायला ठेवा.

अर्ध्या तासाने पीठ एका डावाने चांगले खालीवर व गोल ढवळून घ्या

दुसरीकडे गॅसवर एक डोशाचा नोन सटीक तवा तापायला ठेवा.

तवा चांगला तापल्यावर डावाने तव्यावर एक डाव बॅटर टाकून डावानेच ते तव्यावर सगळीकडे पसरून घ्या. डोशाच्या सगळ्या बाजूंनी चमच्याने तेल सोडा. डोसा कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर भाजत ठेवा.

साधा  डोसा चालत असेल तर तसंच तव्यावरून डिश मध्ये काढून घ्या घडी घाला आणि सांबार व ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

मसाला डोसा हवा असेल तर कांदा-बटाटा  भाजी घालून सगळीकडे पसरून मग कलथ्याने डोशाची घडी करा आणि डिश मध्ये काढून घ्या आणि सांबार व ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search