मोठ्या जांभळ्या भरताच्या वांग्याचे कुरकुरीत फिंगर
चिप्स
साहित्य
: एक मोठे जांभळे वांगं , अर्धी वाटी
तांदूळाची पिठी ,लाल तिखट,मीठ,तेल,बेसनाचे पीठ,जिरे पूड,धने पूड,हळद,हिंग
कृती
: वांगं धुवून घ्या आणि कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घेऊन सालं काढून सुरीने
त्यांचे फिंगर चिप्स कापून ठेवा. एका बाउलमध्ये पाणीघेऊन त्यात थोडेसे मीठ घाला
आणि त्या मिठाचा पाण्यात वांग्याचे चिरून /कापून ठेवलेले फिंगर चिप्स घालून ठेवा
म्हणजे ते काळे पडणार नाहीत.
एका
स्टीलच्या थाळ्यात तांदूळाची पिठी घ्या व
त्यात तिखट आणि मीठ मिक्स करून ठेवा.
नंतर
दुसऱ्या एका मोठ्या बाउल मध्ये बेसनाचे
पीठ घ्या व त्यात लाल तिखट,मीठ , धने-जिरे वावडर व पाणी घालून आपण भज्याला भिजवतो
तसे पीठ भिजवून ठेवा.
दुसरीकडे
गॅसवर कढईत फिंगर चिप्स तळणीसाठी तेल तापायला ठेवा.
आणखीन
एका स्टीलच्या थाळ्यात रवा काढून ठेवा.
अशी
सगळी पूर्व तयारी झाल्यावर मिठाच्या पाण्यातले वांग्याचे फिंगर चिप्स बाहेर काढून
त्यांना सगळीकडून तेलाचे बोट लावून
,तांदुळाच्या तिखट-मीठ मिक्स केलेल्या पिठीमध्ये चांगले घोळवून घ्या व नंतर ते
बेसनांच्या पिठात बुडवून सगळीकडे बेसन पिठाचे कोटींग होईल असे बघा. मग ते
रव्याच्या पिठात घोळवून घ्या आणि तापलेल्या तेलात सोडा.
सर्व
बाजूंनी सोनेरी रंग आला की बाहेर काढा व पेपर नॅपकीनवर टाकून ठेवा.
वांग्याचे खुसखुशीत
व कुरकुरीत स्वादिष्ट फिंगर चिप्स नारळाच्या ओल्या हिरव्या कहाणीसोबत
सर्व्ह करा,
टिप्पणी पोस्ट करा