७/२४/२०२४

रव्याची भाकरी / थालीपीठ

 

रव्याची  भाकरी / थालीपीठ

 

रोज रोज सकाळी नाश्त्यासाठी काय कराचे हा कायमचा प्रश्नच असतो.

नाश्त्यात रोज तेच तेच पदार्थ सुद्धा नकोसे वाटतात.

त्यामुळेच काहीतरी नवे हटके करावे असा विचार सदैव माझ्या मनांत चालू असतो.

काल रात्री मी उद्याच्या नाश्त्या बद्दल विचार करत असतांना अचानक मला एक आयडिया सुचली.

मी लगेच सौं ला म्हटले  , उद्या  आपण नाश्त्यासाठी रव्याची  भाकरी / थालीपीठ   करू या.

मी तिला एक वाटीभर जाड रवा भिजत घाल असे सांगितले.

रवा धुवून घेऊन भिजत घालतांना रवा पूर्ण बुडेल इतके आणि रव्याच्या वर किंचित जास्त पाणी घातले.

ताटर्भर पाण्यात भिजून सकाळी रवा चांगला फुगिन वर आला होता.

मग त्याच्यात चिरलेला कांदा,चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा व मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले रवा असल्याने पीठ एकदम घट्ट झाले नव्हते. थोडेसे सरसरीत्च होये.

मग गवार तवा तापवून घेऊन त्याच्यावर चांचाभर तेल घालून तेल तापल्यावर डावाने त्याच्या वर रावयाचे पीठ घालून त्याच डावाने पीठ सगळीकडे सारख्या जाडीत भाकरीसारखे पासून घेतले . चमच्याने सगळी कडून तेल सोडले आणि भाकरीसारखे तेलावर भाजून घेवून कलथ्याने उलटून घेवून दुसर्‍या बाजूनेही भाजून घेतले.

दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतल्यावर सोनेरी रंग आल्यावर भाकरी तव्यावरून काढून डब्यात ठेवली. 

दहयातल्या हिरव्या चटणी सोबत खायला खूप छान लागते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search