आज रविवार म्हणून स्पेशल जेवणापूर्वी अॅपेटायझर म्हणून टोमॅटो-बीट चे सूप बनवले होते. त्याचीच ही सचित्र रेसिपी शेअर करत आहे.
टोमॅटो-बीट सूप विथ ब्रेड क्रम्स
साहित्य : दोन लाल पिकलेले दळदार टोमॅटो, एक बीट कंद, एक मध्यम आकाराचा कांदा,चार लसणाच्या पाकळ्या,चार काळे मिरे,आल्याचा छोटा तुकडा,चवीपुरते मीठ , लाल तिखट व साखर,सूप दाट होण्यासाठी चमचाभर शिळ्या पावाचा मिक्सरवर करून घेतलेला चुरा किंवा तो नसेल तर कॉर्न फ्लॉवर ,सुपात टाकण्यासाठी वाटीभर ब्रेड क्रम्स ( म्हणजेच तळलेले पावाचे छोटे छोटे तुकडे) ,चिमूटभर लाल खाण्याचा रंग, एक चमचा अमूलबटर, लहान पाव कप दूध.
कृती – टोमॅटो,कांदा आणि बीट यांच्या फोडी करून या व त्यात लसणाच्या पाकळ्या,चार काळे मिरे,आल्याचा छोटा तुकडा,चवीपुरते मीठ , लाल तिखट व साखर घालून मिक्सरला ब्लेंडरवर वाटून आणि नंतर गाळून घ्या. त्यात दूध, अमूल बटर घालून उकळा.
ब्रेड क्रम्प्स व अमूल बटर घालून सर्व्हिंग बाऊल्स मधून सर्व्ह करा.
टिप्पणी पोस्ट करा