आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. पावसाळयात खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/photos/a.403658243129522.1073741826.403654463129900/837105113118164/?type=3&theater