मार्वे हा त्यापैकी जवळचा समुद्र किनारा. किनाऱ्याला लागूनच एक लहान गाव आहे. मच्छिमारी हा येथील लोकांचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. गाव एकूण शांत आहे. समुद्र किनारा स्वच्छ आणि रम्य आहे. सागर किनाऱ्याला लागूनच अनेक खाजगी बंगले आहेत. रेस्ट हाऊसेसही आहेत. सभोवताली असलेली वृक्षराई, ताड-माडाचे उंच वृक्ष यामुळे हे बंगले सुशोभित दिसतात. या ठिकाणी पोर्तुगिजांनी बांधलेलं एक पुरातन चर्च आहे. सागर किनाऱ्याला लागून लहान डोंगर आहेत.
मार्वे गावाच्या पुढे नजीकच्या अंतरावर मनोरी व गोराई ही लहानशी बेटं आहेत. मोटरबोटने मार्वे-मनोरी अंतर जाता येते. याशिवाय पश्चिम उपनगरातील बोरिवली येथूनही लाँचने अवघ्या १५-२० मिनिटात तेथे जाता येते.
या बेटावर त्यामानाने पर्यटकांची वर्दळ अधिक असते. राहण्याची सोय असल्याने व त्यासाठी लहान लहान कुटिरं असल्याने रात्री मुक्कामही करता येतो.
गोराई बीचवरच अलीकडच्या काळात एस्सेल वर्ल्ड नावाची आधुनिक पद्धतीची मनोरंजन नगरी उभारण्यात आल्याने येथे खूप गर्दी असते. अलीकडे ती पर्यटकांना खूपच आकर्षित करते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : मालाड किंवा बोरिवली (प. रेल्वे)
मुंबई-मार्वे (मालाड मार्गे) रस्त्याने अंतर : ४० कि.मी.
भाईंदर रेल्वे स्टेशनवरूनही या तिन्ही समुद्र किनाऱ्यांना भेट देता येते.
संदर्भ: Shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.trpadvisor.com
छायाचित्रे:www.trpadvisor.com