२/०६/२०२०

मुरुड-जंजिरा समुद्र किनारा


प्रसन्न समुद्रकिनारा आणि जलदुर्ग यासाठी अलिबाग जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथील जंजिऱ्याचा जलदुर्ग ३०० वर्षापूर्वी बांधण्यात आला असून वास्तुशिल्पाचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. येथील सागरी किनारा प्रशस्त, स्वच्छ आणि लांबच लांब विस्तारलेला आहे. नारळ व पाम वृक्षांमुळे या किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. हा किल्ला त्या काळी अजिंक्य समजला जात असे. येथील नवाबाचा महाल व जंजिरा गुंफाही प्रसिद्ध आहेत.
मुंबईपासून बसमार्गे हे ठिकाण १६५ कि.मी दूर आहे. पनवेलहूनही या ठिकाणी जाता येते. येथून जवळच नांदगाव व काशीद येथील फारसे प्रसिद्ध नसलेले पण सुंदर किनारे आहेत. नांदगावचा गणपती प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे माघी गणेशोत्सव साजरा होतो व त्यानिमित्त मोठी जत्रा भरते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल
मुंबई-पनवेल : ६९ कि.मी.
पनवेल-मुरुड (रस्त्याने) : १२२ कि.मी.
मुंबई-मुरुड (रस्त्याने) : १६५ कि.मी.





संदर्भ:Shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search