२/०६/२०१५

रागवू नकोस मला



रागवू नकोस मला
मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला
ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला
जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,
आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला
शब्द सापडणार नाही,
एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,
गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,
तुझ्या शिवाय जीवनात अर्थ नाही..
असं मी म्हणतं नाही कारण..
तुझ्या शिवाय जीवनात
जीवच राहणार नाही

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search