२/०६/२०१५

सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाची किंमत १३ हजारांनी कमी केली


सॅमसंगने आपला पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन गॅलेक्सी अल्फाच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाला सप्टेंबरमध्ये ३९ हजार रुपयांमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या किंमतीत आता कंपनीने १३ हजार रुपयांची कपात केली आहे. 
हा स्मार्टफोन आता ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर केवळ २६,९०० रुपयांना मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ३१ हजार ८०० रूपयांना मिळत आहे. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशिअल स्टोअर गॅलरीत हा फोन ३८९०० रुपयांना मिळत आहे. 
सॅमसंगचा गॅलेक्सी अल्फा हा पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन आहे. तो खूपच स्टायलिश आहे. गॅलेक्सी सिरीजचा हा सर्वात चांगल्या डिझाइनचा स्मार्टफोन आहे. 
अल्फाचा डिस्प्ले ४.७ इंचाचा आहे. त्याची जाडी केवळ ६.७ एमएम असून हा फूल HD फोन आहे त्याचे पिक्सल रेझ्युलूशन 720x1280 आहे. 
2 जीबी रॅम सह या फोनची इंटरनल मेमरी ३२ जीब देण्यात आली आहे. मेमरी वाढवता येणे शक्य नाही. 
याचा कॅमेरा १२ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा २.१ मेगा पिक्सल आहे. 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search