का आपण इतकी वर्ष तिच्यासाठी थांबाव.......
ती एक दिवशी नक्की येईल
या आशेने का आपण बसाव
सुखात न राहता आपण
का दुखांना कवटाळून बसाव
का आपण इतकी वर्ष तिच्यासाठी थांबाव.......
नक्की सुखी असेल ती करून लग्न
स्वतःच्या संसारात राहत असेल मग्न
नाही केला तिने आपला विचार
आपण तरी का करावा तिचा विचार
का आपण इतकी वर्ष तिच्यासाठी थांबाव.......
आपणही नव्याने पुन्हा एकदा प्रेमात पडाव
अनं ह्या वेळी मात्र त्या व्यक्तीला नक्की जिंकाव
जिंकून त्या व्यक्तीला इतक प्रेम कराव
अमर प्रेम म्हणून आपल प्रेम ओळखलं जाव.......