१२/२४/२०१४

आई



मुलगा: आई! आई! आई! तु का रडत आहेस? . आई: नाय रे बाळा. मि नाहि रडत रे माझा राजा. . दुसऱ्या दिवशी,,, मुलगा: आई! आई! आई! तु रडत आहेस का? . आई: नाय रे पिल्लू , . मुलगा पुढचा दिवशी आईची पर्स पाहतो आणि त्यात त्याला एक कागद सापडतो, त्यात डाँक्टरने लिहिलेलँ असत की , त्याचा आईला कँसर झालाय आणि ती काही दिवस जगू शकते .. (पुढचा दिवशी टिव्हीवर न्युज येते की पोलिसांना एका मुलगा मृत भेटलाय आणि त्याचा हातात एक चिठ्ठी होती ज्यात लिहल होत, "आई मी स्वत:ला मारलँ आहे आणि आता स्वर्गात तुझी वाट बघत आहे..!. आज पण उद्या पण आई साठी काय पण...!! || माय ||
कळतच नव्हत मला, माय माझी एकटीच का रडायची | तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची || माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची | काय पहात होती कुणास ठाऊक पण, पदराखाली मला घट्ट धरून बसायची ||
पाऊस नव्हता तरी सुद्धा, माझ्या अंगावर थेंब पडायची | मांडीवर मला थोपटतांना, तिची का झोप उडायची ||
काहीच नव्हते घरात तरी, ती घराला फार जपायची | एकच होत लुगड तिला, तेच ती धुवून रोज नेसायची ||
सणावाराच्या दिवशी मात्र, माझ्यावर करडी नजर ठेवायची| जावू नये कुणाच्या घरी म्हणून, मला घरातच लाडीगोडी लावायची ||
रोजच सकाळी हात जोडून, देवाला काहीतरी मागायची | गालावर हात फिरवून माझ्या, बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची ||
मातीच्याच होत्या भिंती, पांढर्या मातीनेच लिंपायाची | अंगणात टाकायची सडा नि, घर शेणाने सुंदर सारवायाची ||
सकाळीही रोजच मला, घासून अंघोळ घालायची | चुलीवरल्या भाकरीचा घास, तिच्या हातानेच भरवायची ||
शाळेत मला धाडतांना, स्वप्ने मोठमोठी बघायची | सांजच्याला थकायचा चेहरा तिचा, तरी माझ्याकडे पाहून हसायची||
कळतच नव्हत मला, आई एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची ||

श्रेय:https://www.facebook.com/MARATHIKAVITA.JOKES

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search