चला ना राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र
दाखवतो...
काय ते तुमचे मावळे होते
जे लढले रयते साठी
अन
काय ते विजयी सोहळे होते जे
सजले राजमातेसाठी
पण
आज तुमचाच मावळा
दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो अन
कशी पाण्याची तहान बिअरवर भागवतो
चला न राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र
दाखवतो...
घरी बाप आत्महत्या करुन मरतो
तरी तुमचा मावळा दारु
मटनाच्या पार्टीसाठी झुरतो
राजकारण्यांची धुणी भांडी करतांना यांचा आत्मा तरी कुठं दुखावतो ?
बघा राजे तुमचा मावळा स्वाभिमानाच्या नावाखाली मान झुकवतो
चला न राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र
दाखवतो...
भगव्याच्या नावाखाली खासदार
आमदार आज कैक झाले
मावळे म्हणवतात आता त्यांचे चेले
त्यांचाही डोळा आता पक्षाचा झेंडा पाहुनच
सुखावतो
म्हणुन
सह्यांद्रीच्या कड्याकडे हिमालय डोळे वर करुन रोखावतो
चला न राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...
रयतेच्या मतासाठी दारात येऊन जे भिक
मागतात
तेच पुढची पाच वर्ष मग रयतेच्याच डोक्यावर नाचतात
गाडी झाली बंगला झाला तरी
त्यांना पैशाचा माज सोकावतो
ईथे तिथे राजकारण्यांच्या कृपेने
भ्रष्टाचार कसा फोफावतो
चला न राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र
दाखवतो...
विसरले परंपरा अन पराक्रमाची कुठे
आता भाषा नाही
तुमच्या मावळ्यांना ईतिहासाची
आता ती नशा नाही
वर्गणीच्या पैशाने
एकदा मिरवणुक काढुन उगाच फुशारकी मिरवतो,
सह्यांद्रीच्या कड्यावर फिरणारा आता पबमध्ये मस्ती जिरवतो
चला न राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र
दाखवतो""