१२/२४/२०१४

पाहता पाहता मोठे झालो



पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||
आजीने घातलेल्या आंघोळीने मन सुद्धा स्वछ होई देवपूजा पाहताना तिची देव सुद्धा मुग्ध होई
मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी दिवसभराची भूक भागे तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी शांत सुखाची झोप लागे
पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || १ ||
७ वाजताच्या बातम्या पाहणे हा आजोबांचा नियम असे 'बातम्या नको,कार्टून लावा' असा आमचा गलका असे
बाजारातून घरी आल्यावर आजोबा सारे त्यांच्याभोवती जमत असू त्यांनी आणलेला खावू सारे वाटून खात असू
आता फक्त आठवणी राहिल्या ते दिवस भरभर सरत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || २ ||
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट महत्वाची वाटायची नाही 'खेळून झाल्यावर अभ्यास' हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे मोठी धमाल असे दोन दगडांच्या stumpa मध्ये world cup ची मजl असे
सागरगोटे,पतंग,भोवरे सोबती सारेच सोडून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||
शनिवारच्या सकाळी शाळेचे आवरताना धांदल होई आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना शिक्षकांच्या नाकी दम येई आम्हाला 'वळण' लावायच्या नादात शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले त्यातले निरागसपण संपून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले दहावीचे वर्ष आले पाहता पाहता सर्व सवंगडी अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस, college, tution च्या गडबडीत 'परीक्षा' हेच उद्देश बनले आणि बालपणीचे सुंदर दिवस आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केवच उडून गेले || ५ ||
आजच्या मोठ्या पगारामध्ये साठवलेल्या भिशी ची मजा नाही मधल्या सुट्टीच्या डब्याची चव office च्या lunch -break ला नाही
आजच्या फोर व्हीलर long drive la सायकल च्या डब्बल सीटची सर नाही रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत आजच्या face बुक chatting ला नाही
गुंफता गुंफता नात्यांचे बंध किस्से सारे आठवत गेले आज थोडे थांबून मागे पाहताना अश्रू माजे ओघळून गेले || ६
श्रेय :https://www.facebook.com/MARATHIKAVITA.JOKES

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search