१२/२४/२०१४
पॉलिसी आणि लूकसोशल नेटवर्किंग साईट फेसबुक १ जानेवारी २0१५पासून आपले नियम आणि पॉलिसींमध्ये बदल करणार आहे. फेसबुकचे म्हणणे आहे की, युझर्सना फेसबुकचा वापर करण्यासाठी काही टिप्स दिल्या जातील आणि त्यांना गाईडही केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रायव्हसीची माहिती जलदगतीने मिळणार आहे. त्याचबरोबर फेसबुक प्रायव्हसीला अधिक अँक्सेसेबल बनवत आहे.
प्रायव्हसी बेसिक्स - या अंतर्गत युर्जसना सांगितले जाईल की, ते कशाप्रकारे फेसबुकवरील आपल्या माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात. उदाहरणार्थ आपणाला अनटॅगिंग, अनफ्रेंडिंग आणि ब्लॉगिंक संबंधी माहिती मिळेल. एवढेच नव्हे तर आपल्या प्रत्येक पोस्टकरिता ऑडियन्स निश्चित करता येईल. ही माहिती ३६ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
आपल्या आजूबाजूला काय होतंय? - फेसबुक आपल्याला अशी माहिती देईल जी आपल्यासाठी उपयुक्त असेल. ही माहिती आपल्या लोकेशनच्या आधारे असेल. उदाहरणच द्यायचे झाले तर जर आपण फेसबुकवर आपली लोकेशन शेअर केली तर ते आपल्या अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी असलेले रेस्टॉरंटचे मेन्यू, सिनेमा हॉल, लायब्ररी इत्यादींची माहिती देतील.
खरेदी करणे होईल सोपे - फेसबुकवर इवबटणचे टेस्टिंग सुरू आहे. ज्याच्या मदतीने युझर्स फेसबुक लॉगआऊट न करता खरेदीही करू शकेल. यासोबतच फेसबुक मनी ट्रान्झ्ॉक्शनला अधिक सोपे करण्याचे कामही सुरू आहे.
फेसबुकच्या कुटुंबाबद्दल माहिती जाणून घ्या - मागील अनेक वर्षांमध्ये फेसबुकचा विस्तार खूप जलद गतीने झालाय. फेसबुक आपल्या युझर्सला आपली कंपनी, अँप्स आणि सर्व्हिसेसबद्दल माहिती देऊ इच्छितात. उदा. जर आपण इन्स्टाग्रामचा पासवर्ड विसरलात तर आपण फेसबुक अकाऊंटच्या माहितीच्या मदतीने पासवर्ड रिकव्हर करू शकाल.