११/२५/२०१४

'इन्टेक्स'चा खिशाला परवडणारा 'अॅक्वा व्ही४'







 भारतीय स्मार्टफोन बनवणारी 'इन्टेक्स' या  कंपनीनं 'अॅक्वा व्ही ४' हा न्यू एन्ट्री लेव्हलचा स्मार्टफोन लाँच केलाय0. इन्टेक्स कंपनीने हा फोन काही बेसिक  फिचर्ससहीत लाँच केलाय.
'इन्टेक्स'चा हा नवा फोन सेल्कॉन 'कॅम्पस ए३५के' या स्मार्टफोनला टक्कर देणारा असेल. सेल्कॉनचा 'कॅम्पस ए३५के' या अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनची किंमत ३००० रूपयांपेक्षाही कमी आहे. भारतीय मार्केटमध्ये अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम असणारे खूप लो बजेट फोन उपलब्ध आहेत. इन्टेक्सचा 'अॅक्वा व्ही4' हा फोन सध्या तरी ई-कॉमर्स वेबसाईट ईबेवर उपलब्ध आहे. आशा आहे की लवकरच हा फोन इतर वेबसाईटवर देखील उपलब्ध होईल त्याचबरोबर इतर रिटेल शॉपमध्ये देखील हा फोन उपलब्ध होईल.
'अॅक्वा व्ही४' चे फिचर्स :-
स्क्रिन - ३.५ इंच, ३२० X ४८० रेझोल्युशन
प्रोसेसर - १ गिगाहर्टझ स्पेक्ट्रम एससी ७७१५ प्रोसेसर
रॅम    -  २५६ एमबी
ऑपरेटिंग सिस्टम -  अँन्ड्रॉईड ४.४.२ किटकॅट
मेमरी कार्ड - ३२ जीबी
कॅमेरा  - २ मेगापिक्सल विथ फ्लॅश
फ्रंट कॅमेरा - व्हिडिओ कॉलिंगसाठी ०.३ मेगापिक्सल VGA कॅमेरा
कनेक्टिविटी ऑप्शन - थ्रीजी,  वाय-फाय, ब्लू टूथ, ए २ डीपी, जीपीएस 


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search