महाराष्ट्रातल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुका ह्या मागील महिन्यात
संपल्या आणि महाराष्ट्रात पंधरा वर्षानंतर सत्तांतर घडलं. तांत्रिक दृष्ट्या अजून
बहुमत सिध्द व्ह्याचय ,परंतु ह्या सरकार कडे बघत असतांना एक सकारात्मक गोष्टं अशी
लक्षात येते कि बऱ्याच वर्षांनी आजच्या घडीला एक असा तरुण मुख्यमंत्री लाभला आहे
जो अभ्यासू तर आहेच परंतु त्यांच्याकडे बघून आता तरुणांनाही राजकारणात यायला हरकत
नाही.
आज पर्यंत अनेक पक्ष हे विविध सभांमधून आणि मेळाव्यात तरुणांनी
राजकारणात या असं ओरडून-ओरडून दामले ,नाही म्हणजे काही तरुण हे राजकारणाकडे
वालतातही परंतु त्यातले कितीसे शुद्ध राजकारण करण्यासाठी येतात हा मोठा प्रश्नच
आहे... कारण ह्यातले बहुतेक हे शो- शायनिंग करण्यासाठीच येतात व काही तर
पदांसाठी येतात . आणि म्हणूनच चांगली आणि स्वच प्रतिमेची तरुण मुलं हि
राजकारणापासून दूर पळत आहे परंतु ह्या निवडणुकीतून जो तरुण मुख्यमंत्री ह्या
राज्याला मिळाला आहे त्याच्या कडे बघून तरी ह्या पोरांनी राजकारणा कडे वळायला हरकत
नाही.
नकीच ह्या मुख्यमंत्र्यांकडे बरीच मोठी मोठी आव्हानं आहे , ते त्यांना
नक्की काही ठीकांनी अवघड जाणार आहे परंतु आव्हान पेलून आणि सामोरे जुनाच इतिहास
रचला जातो हे हि आपण विसरायला नको , त्यामुळे आपण हि ह्या तरुण मुख्यमंत्र्यांच्या
पाठीशी खंबीर पणे उभा राहिलं पाहिजे , अर्थात चांगल्या गोष्टींमध्येच. परंतु जिथे
चुकतील तिथे आपण त्यांचे कानही टोचले पाहिजे आणि त्यांची चूक हि लक्षात आणून दिली
पाहिजे.
तरुणानानी सुधा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कि कुठलाही राजकीय
पक्ष असो ज्यावेळेला एका स्वच्छ चेहरा लोकांसामोर्ठेवायची वेळ येते तेव्हा कोणी
कितीही लॉबिंग करो किवा फोडा – फोडीचं राजकारण करो , तेव्हा तुम्हाच्या पर्यंत
अपोआप ती माळ चालून येते. त्यासाठीच राजकारणात कितीही वाईट लोक आली , त्यांनी जरी
पाण्यासारखा पैसा ओतला तरी तुम्ही जर का स्वच असाल तर अशी महत्वाची पद हि तुचीच
वाट बघत उभी असतात. म्हणूनच ह्या महाराष्ट्रातलं हे सत्तांतर हि तरुण
राजकारण्यांना बरच काही शिकून गेली असं वाटत.
शेवटी एकाच सांगतो राजकारणात अजूनही चांगली माणसं हि येऊ शकतात फक्त
ह्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे नेहमी सकारात्मक राहण्याची आणि
सकारात्मक विचारसरणी ठेवण्याची. त्यामुळे सर्व तरुण राजकारण्यांना एकचं सांगणं आहे
आपण हा महाराष्ट्र तर नं. १ आहेच, पण जर का सगळ्या पक्षातल्या सगळ्या तरुण
राजकारण्यांनी जर का आपापल्या पक्ष सोबतच ह्या महाराष्ट्रासाठी काम केला तर नक्कीच
पुन्हा एकदा आपण हे वाक्य मोठ्याने आणि ओरडून म्हणू शकतो ते म्हणजे ‘ दिल्लीचेही
तख्त राखतो महाराष्ट्र माझा ’ फक्त त्यासाठी ह्या राज्यातल्या ह्या सत्तान्ताराकडे
सकारात्मक नजरेने पहिले पाहिजे. आणि आपला महाराष्ट्र आणि आपली महाराष्ट्रातली लोकं
हि नक्कीच तेवढी सुज्ञ आहेत....
जय हिंद
!!! जय महाराष्ट्र !!!
Rohit Surve
- rohitdsurve@gmail.com