११/१२/२०१४

मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. या नाटकावर बंदी न घातल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
सोलापूर येथील सावरकर विचारमंचचे अध्यक्ष व भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी बुधवारी शिवछत्रपती भवनात हा प्रयोग आयोजित केला आहे. केंद्रात आलेले नवे सरकार एका बाजूला महात्मा गांधीजींचे नाव घेऊन अभियान चालवते आणि दुसऱ्या बाजूला गोडसेंसारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालते हे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. हे नाटक गांधीजी यांच्या विरोधात असून गांधींचा अपमान काँग्रेस कदापीही सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबतचे एक पत्र काँग्रेसच्यावतीने पाटील यांनी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना दिले आहे.
-http://maharashtratimes.indiatimes.com/