११/१२/२०१४

मोटो G 2 साठी लेटेस्ट अँड्राईड 5.0 लॉलीपॉप अपडेशन सुरू.



मोटोरोलाने आपल्या मोटो जी 2 या स्मार्टफोनसाठी गूगलची लेटेस्ट अँड्राईड 5.0 लॉलीपॉप ही अपडेटेड ओएस द्यायला सुरूवात केलीय. भारतात अजून गूगलचा नेक्सस 6 हा लॉलीपॉप ओएस असलेला फोन पोहोचलेला नसला तरी मोटो जी 2 यूजर्सना त्याअगोदरच लेटेस्ट वापरायला मिळणार आहे.
मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटवर मोटो जी 2 यूजर्ससाठी अँड्राईड 5.0 लॉलीपॉपचं अपडेशन सुरू झाल्याचं वृत्त दाखल झाल्यावर काही वेळातच हे अपडेशन काही निवडक यूजर्ससाठी फक्त चाचणी साठीच असल्याचा खुलासाही आला. त्यामुळे आजच्या आजच सर्व मोटो जी 2 यूजर्सना लॉलीपॉप अपडेशन मिळणार नसलं तरी येत्या काही दिवसात ते मिळेल, हे स्पष्ट आहे.

आपल्या मोटो जी 2 मोबाईलमध्ये गूगलची लेटेस्ट अँड्राईड 5.0 लॉलीपॉप ही अपडेट ओएस कशी इन्स्टॉल करायची याचा तपशील मोटोरोलाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे, त्यासाठी इथे क्लिक करा

एलजीच्या एलजी जी 3 या फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी येत्या काही आठवड्यातच अँड्राईड 5.0 लॉलीपॉप हे लेटेस्ट अपडेशन मिळणार आहे. त्यापूर्वीच मोटोरोलाने आजपासून सोक टेस्ट सुरू केलीय. मोटोरोलाने आपल्या मोटो एक्स 2 या स्मार्टफोनसाठी लेटेस्ट अँड्राईड 5.0 लॉलीपॉपचं अपडेशन यापूर्वीच सुरू केलंय.

अँड्राईड 5.0 लॉलीपॉप ही लेटेस्ट ओएस असलेल्या गूगल नेक्सस 6 या फोनची किंमत खूप जास्त असल्याच्या बातम्या यापूर्वीच येऊन गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर मोटोरोलाने आपल्या बजेट रेंजच्या म्हणजे तुलनेने स्वस्तातल्या स्मार्टफोनमध्ये लॉलीपॉप अपडेशन द्यायला सुरूवात केलीय, हे उल्लेखनीय आहे.

सोक टेस्ट म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंगची एक सर्वमान्य पद्धत आहे. यामध्ये फक्त सॉफ्टवेअर एक्सपर्टच नाही तर सर्वसामान्य पण निवडक यूजर्सना नवीन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी दिलं जातं. त्यानंतर त्यांचे त्या सॉफ्टवेअरविषयीचा फीडबॅक गोळा केला जातो.

-abpmajha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search