११/०६/२०१४

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे



खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे,
तळ्यातल्या कमळापरी रूपवान व्हावे
नजर माझ्यावर पडताच त्याची, मी गर्वाने
फूलून जावे...
लाल गर्द रंगाने माझ्या त्याला आकरषून
घ्यावे
पण?
पण जवळ माझ्या येताच तो जरा थबकला तर??
चीखलाने पाय माखतील म्हणून पाऊल मागे
वळवले तर???
शेवटी कमळ जरी असले तरी हेच माझ सत्य
म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे.....

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे
बागेतल्या गूलाबापरी सूंदर दीसावे....
सूगंध माझा घेताच त्याचे भान हरपून जावे...
गूलाबी रंगाने माझ्या त्याला भाळून
टाकावे...
पण???
पण स्पर्ष माझ्या काट्याला होताच रक्त
त्याचे ओशाळले तर??
मग रूपाने सूंदर असूनही नजर त्याने
वळवली तर???
शेवटी गूलाब जरी असले तरी हेच माझं सत्य
म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे...

खरच कधीतरी मनीप्रमाणे घडावे
श्रावणात बहरलेल्या प्राजक्ता प्रमाणे
मी बहरावे....
हवेच्या झूळके सरशी मनमूराद बागडावे...
हसतांना मला बघून त्याने हरऊन जावे...
पण??
पण स्वत:ची पालवी सोडून
मी दूसर्यंाच्या अंगणात बहरली तर???
तू माझी कधी नव्हतीच म्हणून त्याने
मला नाकारले तर?
शेवटी प्राजक्ता जरी असली तरी हेच माझं
सत्य म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे.....

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे....
लख्ख चांदण्यांचंया प्रकाशातली रातराणी म्हणून मी फूलावे....
सूगंध माझा दरवळताच त्याने मंत्रमूग्ध व्हावे...
माझ्या नाजूक सौंदर्याला त्याने मन भरून
बघावे.
पण?
पण रात्र ऊलटून दीवस ऊजडताच
तो मला वीसरला तर?
प्रकाशात माझं काही अस्तीत्वच नाही असं
तो म्हणाला तर??
शेवटी रातराणी जरी असली तरी हेच माझं
सत्य म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे.....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search