व्हॉट्सअॅपच्या वापरामध्ये आता ‘रीड रीसिप्ट’ या आणखी एका फिचरची भर पडली आहे. व्हॉट्सअॅपवर तुम्हाला अॅड असलेला तुमचा मित्र किंवा अन्य कोणताही व्यक्ती तुमचा मॅसेज न पाहिल्याचे कारण सांगू शकणार नाही. तुम्ही पाठवलेला मॅसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
यापूर्वी पाठवलेला मॅसेज समोरच्याला मिळाल्यानंतर मॅसेजच्या समोर टीक केलेले ग्रे कलरचे चिन्ह येत असे. त्यावरून लक्षात यायचे की, समोरच्या मॅसेज मिळाला आहे. मात्र तरीही समोरचा व्यक्ती कारण देऊ शकत होता की, माझा डेटा सुरू होता, पण मी मॅसेज पाहिला नाही. आता हे कारण देता येणार नाही. समोरच्या व्यक्तीने मॅसेज वाचल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंट समोर पूर्वी दोन टीक येणाऱ्या जागेवर आता निळ्या रंगाचे चिन्ह येणार आहे.
व्हॉट्स अॅपच्या या सुविधेमुळे आता तुमचा मित्र किंवा अन्य व्हॉट्स अॅप यूजर खोटं बोलू शकणार नाही.
-ABP Majha