अनोळख्या वाटेवरी सागं रे मी शोधू कोठे तुला,
का रे गेलास सोडून तू एकटा येथे असा मला...
वाट तुझी बघता बघता आज थकून गेले पापण्या,
नसता सोबत तू माझ्या का वाटे ह्या वाटा जून्या...
अनोळख्या वाटेवरी सागं रे मी शोधू कोठे तुला,
का रे गेलास सोडून तू एकटा येथे असा मला...
क्षणभर मिटताच डोळे का रे आठवतो तू सारखा मला,
स्पंदनेही बेभान होत असे अजून बघता समोर तूला...
अनोळख्या वाटेवरी सागं रे मी शोधू कोठे तुला,
का रे गेलास सोडून तू एकटा येथे असा मला...
विखूरलेल्या त्या क्षणाला आज मी वेचू लागले,
वेचता वेचता त्या क्षणाना डोळे माझे भरुन आले...
अनोळख्या वाटेवरी सागं रे मी शोधू कोठे तुला,
का रे गेलास सोडून तू एकटा येथे असा मला...
मनी एकचं खंत आहे,की मी तुझी नाही होवू शकले,
हे माहित असूनही की मीच तुझ्या मनात होते वसले....
अनोळख्या वाटेवरी सागं रे मी शोधू कोठे तुला,
का रे गेलास सोडून तू एकटा येथे असा मला......!!
स्वप्नील चटगे.