११/११/२०१४

प्रतापगड



प्रतापगडाच्या पायथ्याला महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून आदिलशाहीला जोराचा धक्का दिला ह्या युद्धात मराठ्यांचा दणदणीत विजय झाला.

अफझलखानच्या सैन्यात १२००० घोडदळ, ११५०० पायदळ व बंदुकधारी, ८५ हत्ती, १००० उंट, ८० ते ९० तोफा एवढा मोठा प्रचंड लवाजमा घेवून अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता. जवळपास चालते बोलते शहर घेवून तो आला होता विचार करा महाराजांची काय अवस्था झाली असेल पण असे काही नाही झाले महाराजांनी डोके शांत ठेवून आपल्या चानाक्ष्य बुद्धीने अन गनिमीकाव्याने त्याचा पाडाव केला.


आता महाराजांचे सैन्यबळ पाहू फक्त ६००० घोडदळ, ३००० पायदळ, ४००० राखीव पायदळ मनभर अफझलखानच्या सैन्यापुढे महाराजांचे सैन्य अगदी कणभर होते.
ह्या युद्धात मराठ्यांचे १७३४ मराठे कमी आले अन ४२० जखमी झाले अन अफझलखानाचे ५००० सैन्य कापले गेले तर ५००० जखमी झाले आणि ३००० युद्धबंदी तसेच सर्व हत्ती,उंट,तोफा मराठ्यांच्या हाती आल्या.

हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि वोजास्वी असा महाराजांचा पराक्रम होता.

जय जिजाऊ
जय शिवराय

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search