मोबाईल मॅसेंजरमधील नंबर एकचे अॅप असलेल्या व्हॉट्स अॅपला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर शुल्क लागू करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर येत होती. मात्र असे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती व्हॉट् अॅपचे बिझनेस हेड निरज अरोरा यांनी दिली.
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्स अॅपला शुल्क आकारले जाण्याची माहिती समोर आली होती. मात्र व्हॉट्स अॅपच्या वर्षपूर्तीनंतर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नसल्याचं व्हॉट्स अॅप प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
भारतात व्हॉट्स अॅपचा वापर वाढला आहे. भारतात जवळपास 6 कोटींपेक्षा अधिक व्हॉट्सअॅप यूजर्स आहेत. व्हॉट्स अॅप यूजर्सच्या बाबतीत जगभरात भारताचा 10 वा क्रमांक लागतो. याशिवाय भारतातून व्हॉट्स अॅपला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-ABP Majha