सकाळी कामाला वेळेवर पोहचण्यासाठी रिक्षाची वाट पाहत तासनतास ताटकळत उभं राहावं लागतं. प्रवाशांना मोठ्या प्रयत्नांनंतर रिक्षा मिळते. पण आता रिक्षासाठी वाट पाहण्याची कटकट संपणार आहे. डोंबिवलीतील एका तरुणाने पुढाकार घेऊन प्रवाशांना हवी तेथे रिक्षा एका फोनवर उपलब्ध करुन दिली आहे.
ओंकार पाठक असं या तरुणाचं नाव असून त्याच्या उपक्रमाला 75 रिक्षा चालकांनी सहकार्य केलं आहे. 'ऑटो ऑन कॉल' या नावाची सुविधा ओंकर पाठक या तरुणाने डोंबिवलीकरांना उपलब्ध करुन दिली आहे
डोंबिवलीत 25 हजारांहून जास्त रिक्षा आहेत. तरीही प्रवाशांना गर्दीच्या वेळी रिक्षा उपलब्ध होणं कठीण झालं होतं आणि रिक्षा मिळाली तरी रिक्षावाला त्याच्या मर्जीप्रमाणे भाडे मागत असल्याने प्रवाशांची कुचंबना होत होती. यावर मात करण्यासाठी डोंबिवलीतील युवकाने 'ऑटो ऑन कॉल' ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे.
यासाठी प्रवाशांनी 9321606555 आणि 9321905555 या क्रमांकावर फोन केल्यावर 10 ते 15 मिनिटांत रिक्षा दारात येईल. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही ज्यादा शुल्क आकारले जाणार नाही. रिक्षाचा मासिक पास ही सुरु करण्याची संकल्पना या योजनेअंतर्गत राबवली जाणार असल्याचे ओंकार पाठक यांनी सांगितलं.
ही सुविधा आजपर्यंत पुणे शहरात विविध रिक्षा संघटनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. त्याच धर्तीवर डोंबिवलीतही ही सेवा देण्याची तयारी रिक्षा संघटनानी दाखवली आहे. डोंबिवली पूर्वेकडील 75 रिक्षाचालकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
प्रवाशांनीही या उपक्रमाचं स्वागत करत, रिक्षाचालकांनी मुजोरीला आवर घालत प्रवाशांना सेवा द्यावी अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.
तर या योजनेमुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत फायद्याची आहे. तसंच कधीतरी एखादी वस्तू विसरल्यास, आपल्याकडे आलेल्या रिक्षाचालकाचा नंबर असल्याने, ती वस्तू सुरक्षित राहिल याची खात्री मिळते.
'ऑटो ऑन कॉल' या उपक्रमात सामील झाल्याने प्रवाशांना शोधत रिक्षा फिरवावी लागणार नाही आणि त्यामुळे पेट्रोलची बचत झाली आणि पैसे वाचण्याचा फायदा झाल्याचं रिक्षाचालक सांगतात. तसंच 'ऑटो ऑन कॉल' ही योजना डोंबिवलीकरांना निश्चितपणे उपयोग