६/२३/२०१४

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे


अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत. 

शेतकरी अजुनही आतुरतेने पावसाची वाट पाहातायत. पण सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीची `नजर` अजूनही दिल्लीवर आहे. 

कारण दिल्लीत अजूनही मुख्यमंत्री बदलाची खलबतं सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवारात पावसाचं वातावरण दिसत नाहीय, तर वेगवान वारे वाहतायत. जून महिना संपायला आला तरी, शिवार हिरवं नाही, तर कोरडं दिसतंय.

शिंदेंच्या नावाचं चर्चेचं वादळ
अशी वेळ राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर असतांना, मात्र काँग्रेसने सत्ता बदलासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत बोलवून घेतल्याची चर्चा आहे. सुशीलकुमार शिंदे हे दिल्लीत दाखल झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन-चार महिने शिल्लक राहिले असतांना काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्व बदल करून काय साध्य करणार आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search