६/२३/२०१४

‘लय भारी’ अडचणीत



रितेश देशमुखचा 'लय भारी' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकास 'लय भारी डॉट कॉम'चे सचिन वाझे यांनी आक्षेप घेतला आहे. आपण सन २०१०मध्ये 'लय भारी', 'लय भारी डॉट कॉम', 'लयभारी' या शब्दांचा कॉपीराईट घेतल्याचा त्यांचा दावा असून सिनेमाच्या नावात 'लयभारी'चा वापर केल्याप्रकरणी त्यांनी संबंधितांविरोधात पाच कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.

वाझे यांनी याप्रकरणी जेनेलिया देशमुख, निर्माता अमेय खोपकर, जितेंद्र ठाकरे, दिग्दर्शक निशिकांत कामत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी विनंतीही त्यांनी एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन लिमिटेड, मुंबई फिल्म कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, झी टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड यांनाही केली आहे.


'लय भारी' हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचा प्रमोशनल व्हिडिओ यू-ट्युबवर प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब वाझे यांनी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकांच्या निदर्शनास आणून दिली. या तक्रारीस दोघांनीही प्रतिसाद न दिल्याने वाझे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search