६/२५/२०१४

मुंबईकरांनो, आज म्हाडाची लॉटरी

मुंबईकरांनो, आज म्हाडाची लॉटरी


मुंबईकरांचं स्वस्त घराचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. मुंबई आणि कोकण येथील 2 हजार 641 घरांसाठी आज दुपारी 10 वाजता म्हाडाची लॉटरी लागणार आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईच्या विविध भागांतील 814, विरार-बोळींज येथील एक हजार 716 आणि वेंगुर्ल्यातील 111 सदनिकांसाठी ही सोडत निघणार आहे.
 
या घरांसाठी 93,130 अर्ज आलेत.. हा निकाल पहाण्यासाठी अर्जदार स्वत: उपस्थीत राहू शकतात. प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.
मात्र रंगशारदा सभागृहाची मर्यादीत आसनक्षमता पहाता इच्छुक अर्जदारांना प्रवेशिका घेणं बंधनकारक असणार आहे.
या शिवाय सभागृहाबाहेर घातलेल्या मंडपातील मोठ्या पडद्यावरही अर्जदारांना निकाल पहाता येईल तसेच वेबकास्टिंग माध्यमातूनही निकाल पहाण्याचे तिसरे व्यासपीठ अर्जदारांना प्रथमच उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search