लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आता विधानसभेत उक्त भरुन काढण्यासाठी आघाडीच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. संध्याकाळी पाच वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक प्रलंबित आणि महत्वाच्या मुद्यांना हात घातला जाणार आहे.
सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या एलबीटीच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. एलबीटी लागू झाल्यापासून जवळपास 26 पालिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. तर दुसरीकडे एलबीटीची अंमलबजावणीही व्यापाऱ्यांना अन्यायकारक वाटत आहे.
दुसरीकडे मुस्लिम आणि मराठा आरक्षणाचंही गाजर सरकार पुढे करण्याच्या तयारीत आहे. मुस्लिमांना साडेचार टक्के तर मराठ्यांना 20 टक्के आरक्षण देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत अपेक्षित आहे.
त्यामुळे बैठकीदरम्यान नेमके कोणत्या निर्णयांना हिरवा कंदील मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा