मान्सून मुंबईत दाखल होऊन दोन आठवडे उलटले तरीही मुंबईसह राज्यभरात तो अजूनही सक्रिय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा हवालदिल झाला आहे.
यापूर्वी 2009 साली 21 जूनला मान्सून सक्रिय झाला होता. मात्र यंदा 21 जून उलटून गेल्यानंतरही मान्सूनचा मागमूसही दिसत नाही. पेरण्या करण्याची वेळ आली तरीही पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडं डोळे लावून बसला आहे. मात्र पावसाचा काही पत्ता नाही.
मुंबईतही यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण सरासरीच्या कैकपटीने कमी झालं आहे.
त्यामुळं महाराष्ट्रातला ग्रामीण भाग असो वा शहरी भाग सगळेजण पावसाची चातकाप्रमाणं वाट पाहत आहे.
आणखी काही दिवस जर पावसानं अशीच दडी मारली तर राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. याबरोबरच पेरण्या करुन बसलेल्या शेतकऱ्यांचं बियाणं मातीतच जाण्याची वेळ येईल.
त्यामुळं वरुणराजा आता तरी राज्यावर कृपादृष्टी दाखव अस म्हणण्याची वेळ आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा