६/१३/२०१४

ठाणे विभाजनावर शिक्कामोर्तब, पालघर नवा जिल्हा !

sd424thane

13 जून: गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहेत. ठाण्याबरोबरच पालघर हा आता नवा जिल्हा असणार आहे. आता ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ,कल्याण,मुरबाड,भिवंडी आणि शहापूरचा समावेश असणार आहे. तर नव्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड , वाडा, वसई, डहाणू आणि तलासरी या विभागांचा समावेश असणार आहे.
नव्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच जिल्हा सहकारी बँक असणार असून तर ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात येणार आहे. पण जव्हारकरांनी जव्हारऐवजी पालघर जिल्हा केल्यानं नाराजी व्यक्त केलीय. तर ठाणे जिल्हा विभाजनाला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. विभाजन केवळ हे राजकीय सोईसाठी करण्यात आले आहे असा टीका सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केली.
तर वसई विकास आघाडीचे आमदार विवेक पंडित यांनीही नाराजी व्यक्त करत वसईला ठाणे जिल्ह्याला जोडायला हवं होतं असं मत व्यक्त केलं. जास्त लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या सध्याच्या ठाणे जिल्ह्यावर प्रशासनाच्या दृष्टीने अडचणी येत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा सरकारचा विचार आहे. ठाणे जिल्ह्याच्या त्रिभाजनाची मागणी होती. पण सरकार विभाजन करण्याच्या विचारात आहे.
हे दोन जिल्हे कसे असतील ?
  • - ठाणे जिल्हा – ठाणे,अंबरनाथ,कल्याण,मुरबाड,भिवंडी आणि शहापूरचा समावेश
  • - पालघर जिल्हा – पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड , वाडा, वसई, डहाणू आणि तलासरी
  • - नव्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच जिल्हा सहकारी बँक
  • - नव्या जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात येईल
ठाणे जिल्ह्याची काही ठळक वैशिष्ट्यं ?
  • - गेल्या 30 वर्षापासुन ठाणे जिल्ह्याचं विभाजन व्हावं ही नागरिकांसह राज्यकर्त्यांचीही विरोध
  • - आशियातील सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा
  • - राज्यात घनता आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा
  • - ठाणे , कल्याण-डोंबिवली , उल्हासनगर , भिवंडी , निजामपुर, वसई, विरार, मिरा भाईंंदर, नवी मुंबई या महापालिकांचा
  • समावेश.
  • - 6 नगरपालिकांचा समावेश
  • - एक जिल्हापरीषद
  • - एक जिल्हा सहकारी बँक
  • - गुजरातची सीमा, सागरी तट,नाशिक, अहमदनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सिमा भागाशी ठाणे जिल्हा जोडला गेलाय.
  • - ठाण्याचं चार भागात विभाजन व्हावं अशी मागणी
  • - आगरी , सागरी , डोंगरी आणि शहरी असं विभाजन व्हावं
  • - यावर एकमत नसल्यानं 30 वर्षापासुन विभाजन रखडलं
  • - जिल्ह्याचं विभाजन दोन भागात व्हावं यावर एकमत

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search