६/२६/२०१४

गूगलचा स्वस्त स्मार्टफोन पहिल्यांदा भारतात होणार लॉन्च

गूगलचा स्वस्त स्मार्टफोन पहिल्यांदा भारतात होणार लॉन्च


गूगल आता खूप स्वस्त असा स्मार्टफोन उतरवण्याच्या तयारीत आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी अॅन्ड्रॉईडचा आधार घेतला आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या अॅन्ड्रॉईड वनच्या अंतर्गत हे पाऊल उचलले आहे. 
अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंगने असणाऱ्या या फोनला अनेक वैशिष्ट्यपूर्ण बनवलंय. यात एफएम रेडिओ आणि स्क्रिन 5 इंचापेक्षा कमी आहे. याची किंमत 100 डॉलर (अंदाजे 6000 रुपये) एवढी असू शकते.  ही गोष्ट गूगलचे उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या वार्षिक संमेलनाच्या वेळी सांगितली. 
कंपनी या फोनला संपूर्ण जगात सादर करणार आहेत. मात्र सर्वांत पहिले भारतात उतरवणार आहेत. येत्या हिवाळ्यात हा फोन लॉन्च केला जाईल. 
पिचाई यांनी सांगितले की, भारताच्या टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत हा फोन विकण्यासंबंधी गूगलचं बोलणं झालं आहे. कंपनीला वाटतंय की, हा फोन विक्री पॅकेजचा भाग असावा. यात इंटरनेटची सुविधा असेल. गूगलचा अॅन्ड्रॉईड वनचा प्रयोग हा स्मार्टफोन निर्मात्यासोबत एकत्र मिळून करावा, कारण त्यामुळं हार्डवेअर तयार करण्यासाठी चांगलं सोल्यूशन मिळू शकेल.  
जगात असे अब्जावधी लोक आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. त्यासाठी कंपनी त्यात बदल आणणार आहे. गूगल स्मार्टफोन निर्माते आणि इंडस्ट्रीतील स्पर्धकांसोबत फोन सादर करण्यास इच्छुक आहेत. त्या अंतर्गत 100 डॉलरहून कमी किंमतीचा फोन बनवला जाऊ शकेल. 
गूगल आणि फेसबूक लोकांना जोडण्यासाठी खूप प्रकारच्या कार्यक्रमावर काम करत आहेत. गूगलला वाटतंय की, जगातल्या सर्व लोकांनी नवीन टेक्नॉलॉजी वापरावी. जेवढे लोक इंटरनेटला सहभागी होतील. त्यामुळं ऑनलाइन जाहिरातींना तेवढीच कमाई होईल. 
याच्या आधी मायक्रोस्फॉटनी 99 युरोमध्ये(135 डॉलर) स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली होती. स्मार्टफोन बाजारात आता चांगलीच स्पर्धा होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search