६/२६/२०१४

वीर तानाजी मालुसरे यांची ‘यशवंती’ पडद्यावर




सिंहगडाचं युद्ध इतिहासात अजरामर झालं. नरवीर तानाजी मालुसरे यांनी या युद्धात यशवंती नामक घोरपड वापरल्याचं लोककथांमध्ये सांगितलं जातं. इतिहासात या कथेला आधार नसला तरी मराठी सिनेमाच्या पडद्यावर खरी यशवंती दिसणार आहे. सिनेमातलं तंत्रज्ञान हॉलिवूडच्या दर्जाचं दिसावं यासाठी सिनेमाच्या टीमनं खऱ्या घोरपडी पाळल्या आहेत. 

मराठी सिनेमातलं अॅनिमेशन अनेकदा प्रेक्षकांसाठी 'हास्यास्पद अनुभव' ठरतं. मराठी सिनेमातला अॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट्सचा दर्जा हॉलिवुडच्याच तोडीचा आहे हे दाखवण्यासाठी 'यशवंती' सिनेमाटी टीम सज्ज झाली आहे. वर्तमानातलं सिंहगडाचं युद्ध या सिनेमात दिसणार आहे. त्यासाठी सिनेमाची टीम हाय स्पीड कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान वापरून सध्या खऱ्या घोरपडींच्या हालचाली टिपत आहे. 

शूटिंग स्टार एंटरटेन्मेंट या बॅनरखाली अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स तज्ज्ञ निखील भगत 'यशवंती' हा मराठी सिनेमा बनवत आहेत. अमेय वाघ आणि सुपर्णा श्याम ही जोडी या सिनेमात झळकणार आहे. प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, राहुल सोलापूरकर, पूजा पवार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. 

yashvanti
यशवंती सिनेमासाठी आम्ही गेली १० पेक्षा अधिक वर्ष हॉलिवूड सिनेमांसाठी काम करणारे तंत्रज्ञ वापरतो आहोत. घोरपडी हल्ला कसा करतात, पवित्रा कसा घेतात ही सगळी दृश्यं हायस्पीड कॅमेऱ्यानं खऱ्याच घोरपडींवर चित्रित होत आहेत. त्यामुळे यशवंतीमध्ये अॅनिमेशनं उच्च दर्जाचंच असेल. 

- निखिल भगत, निर्माते

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search