पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून ठेवला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा दुसरा भाग भरायचा असून, विद्यार्थ्यांना १८ ते २५पर्यंत अर्ज सादर करता येईल.
अर्जात काही त्रुटी असल्यास त्या २६ जूनपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्त करता येणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर १८ ते २७ जूनपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
या कोट्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तसेच २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त आणि इनहाउस कोट्यातील शिल्लक जागा महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाइन सादर करावा लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा