या पोस्टरवर राज ठाकरे स्वच्छतेसाठी लोकांना जागरूक करताना दिसत आहेत. हे पोस्टर पाहिल्यानंतर मात्र राज ठाकरेंचा पारा चढला आणि त्यांनी हे पोस्टर तिथून हटवण्याचा तत्काळ आदेश देऊन टाकला.
मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या एका पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी बोलताना राज ठाकरेंनी या प्रकरणाची टर उडवली. ‘टॉयलेटला जाणाऱ्या लोकांना हे खूप विचित्र वाटत असेल... त्यांना वाटेल की मी त्यांच्यावर नजर ठेवतोय’ असं म्हणत राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
यानंतर दरेकर यांनी राज ठाकरेंसोबत आपलाही फोटो त्या पोस्टरवरून हटवण्यासंबंधीच्या सूचना दिलाय. पण, मनसेचे कार्यकर्ते मात्र या निर्णयामुळे खूश नाहीत... त्यांच्या म्हणण्यानुसार, या पोस्टरमुळे लोकांवर सकारात्मक परिणाम झाला असता आणि समाजात एक चांगला संदेश गेला असता.
टिप्पणी पोस्ट करा