६/१५/२०१४

सावधान..! समुद्राला आजही उधाण

सावधान..! समुद्राला आजही उधाण


मुंबईकरांनो सावधान.. समुद्राला आजही उधाण आहे. 

मरिन ड्राईव्हजवळ दोन जण समुद्रात पडले, एकाला वाचवण्यात यश आलं असलं, तरी दुसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे, ही घटना आज दुपारी झाली.

सुट्टीचा आनंद बीचवरून घ्या.. पण पाण्यात उतरू नका.. 

आज दुपारी दोन वाजता समुद्राला भरती सुरू झालीय. समुद्रात ४.८५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पाण्यात जाऊ नका.. पाण्याला ओढ आहे.

नानौक चक्रीवादळ ओमानकडे सरकलं असलं तरी त्याचा इफेक्ट अरबी समुद्रावर आहे. 

त्यामुळे आपली रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी समुद्रावर जाणार असाल तर सावधान.. पाण्यापासून दूर राहा.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search