मुंबई: आपल्या विविध अदांमुळे सातत्याने चर्चेत असणारी बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, एका पार्टीतल्या तिच्या ‘साडी लूक’ला लागलेली सेफ्टी पिन.
करीनाचा चुलत भाऊ अरमान जैन याचा पहिला वहिला चित्रपट ‘लेकर हम दिवाना दिल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चसाठी करीना अवतरली ती खास भारतीय पेहरावात. पांढरी साडी आणि त्यावर काळा ब्लाऊस असा वेश करीनाने परिधान केला होता.
करीनाच्या साडीवाल्या लूकमुळे पार्टीतील उपस्थितांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या. मात्र चंद्रावर ज्याप्रमाणे डाग आहे, तसाच तो करीनाच्या या लूकमध्येही पाहायला मिळाला.
कारण करीनानं घातलेल्या ब्लाऊजला मोठ्या सेफ्टी पिनचा आधार देण्यात आला होता. ब्लाऊजला सेफ्टी पिन लावल्याने करीनाच्या या लूकची सारी शोभाच गेली. त्यामुळे पुढच्यावेळी करीना आपल्या चाहत्यांची काळजी नक्की घेईल हीच अपेक्षा.
टिप्पणी पोस्ट करा