नागपूर : कडाक्याच्या उन्हामुळे विदर्भात उष्णतेची प्रचंड लाट पाहायला मिळतेय आहे. नागपुरात यंदाच्या मोसमातलं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. नागपुरातलं कालचं तापमान 44.2 डिग्री सेल्सियस इतकं होतं.
काही दिवसांपूर्वी विदर्भात वारा आणि ढगांचा लपंडाव पाहायला मिळाला होता. मात्र आता सुर्यानं चांगलीच आग ओकायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. चंद्रपूर आणि गोंदियानंही 44 चा टप्पा ओंलाडला आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्यानं नागरिक रुमाल, टोप्यांसह बाहेर पडताना दिसत आहेत.
यापुढच्या काळातही पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उन्हानं अंगाची लाही-लाही होत असल्यानं विदर्भवासियांना आता पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा