
भारतीय जनता पक्षाने जसे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले, त्याच प्रमाणे राज ठाकरे नाव राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली.
राज ठाकरे ३१ मेला मुंबईत सोमय्या मैदानात जाहीर सभा घेऊन, भूमिका जाहीर करणार आहेत. या बैठकीच्या आयोजनासाठी मुंबईच्या दादर भागातील यशवंतराव नाट्यगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र मोदीप्रमाणे राज ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्त्व स्वीकारावं, अशी मागणी करण्यात आली. राज ठाकरे राज्याचे नेतृत्त्व करण्यात सक्षम आहे, जनता राज ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील असा विश्वास मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
झी मीडिया, मुंबई
टिप्पणी पोस्ट करा