१०/३०/२०१४

ओप्पोचे दोन भन्नाट मोबाईल, एक जगातील सर्वात स्लिम, तर दुसरा रोटेटिंग कॅमेरा असलेला

ओप्पो या मोबाईल कंपनीने आणखी दोन फोन लाँच केले आहेत. N3 आणि R5 असे हे दोन फोन आहेत.

रोटेटिंग कॅमेरा फिचर हे N3 चं वैशिष्ट्य आहे. तर जगातील सर्वात स्लिम मोबाईल म्हणून R5 बाजारात आणला आहे.
N3 ची वैशिष्ट्ये

16 मेगा पिक्सेल रोटेटिंग कॅमेरा,

360 डिग्रीमध्ये फोटो टिपण्याची क्षमता

वाईड अँगल आणि पॅनारोमिक शॉटची क्षमता

किंमत सुमारे 39 हजार रुपये

R5 ची वैशिष्ट्ये

जगातील सर्वात स्लिम फोन, 4.85MM रुंदी

चेंज मटेरियलचा उपयोग करता येणार, तापमानही कायम राखता येणार

 टार्गेट ट्रॅकिंग फोकस शिफ्ट फंक्शन.

ओप्पोच्या मिनी रॅपिड चार्जिंग सिस्टिममुळे 30 मिनिटे रिचार्ज केल्यास 75 टक्के बॅटरी रिचार्ज होते.

ओप्पोच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमुळे 4G LTE, 3G, वाय फाय, ब्ल्यूटूथ 4.0 आणि जीपीएसचा समावेश आहे. 

किंमत 30 हजार रुपये


-ABP Majha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search