१०/३०/२०१४

विमानतळावर छत्रपतींचा एकेरी उल्लेख


राज्यातील काही नेते मंडळी जणू आपल्याकडेच छत्रपती शिवाजी महाराजांचा 'कॉपीराइट' असल्याच्या आविर्भावात त्यांच्या नावाने राजकारण करीत असतात. पण, या राजकारण्यांचे छत्रपतींवरचे प्रेम बेगडी असल्याची घटना समोर आली आहे. महाराजांच्याच नावाने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशाच्या रस्त्यावरील फलकावरून 'छत्रपती' आणि 'महाराज' या आदरार्थी उपाध्या गायब झाल्या आहेत. या ठिकाणी केवळ 'शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट' एवढाच उल्लेख आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.

'सोसायटी फॉर अवेअरनेस ऑफ सिव्हिल राइट्स' या संस्थेने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे फोटोसह या प्रकाराची तक्रार केली आहे. संस्थेचे अध्यक्ष आर. पी. यजुर्वेदी राव यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. ते म्हणाले की, जीव्हीके कंपनीने सरकारबरोबर विमानतळ विकासाचा करार करण्यापूर्वीच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. पण महाराजांच्या नावाचा यथायोग्य सन्मान राखण्यात ते कमी पडले आहेत. स्वराज्याचे शिल्पकार असलेल्या महाराजांचा हा अवमानच आहे.

मोठ्या संख्येने राजकारणी, नेतेमंडळी मुंबई विमानतळावर ये-जा करतात. तरी, त्यांच्यापैकी कुणाच्या दृष्टीस ही गोष्ट सलू नये, यासारखी खेदजनक गोष्ट नाही. आता नगरविकास खाते, उपनगर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिवांनी एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


-maharashtratimes

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search