७/१३/२०२४

इडली,ब्रेड,पोटॅटो पाकोडे

 

इडली,ब्रेड,पोटॅटो पाकोडे

 

 





आज सकाळच्या नाष्ट्याला  काय करावे असा विचार आम्ही दोघे करत असतांनाच मला फ्रीजमध्ये तयार इडली-डोशाचे पिठाचा पाऊच दिसला. फ्रीजमध्ये दोन उकडलेले बटाटेही होते.

सौ. म्हणाली की मी आलू पराठे करू कां?

थोडासा विचार करून मी तिला म्हटले की जरा वेळ थांब, मी दुधाच्या पिशव्या बरोबर येतांना पाव सुद्धा घेऊन येतो.  

इडली-डोसा पीठ,उकडलेले बटाटे व पांव या टिनहीचा वापर करून आपण आज एक नवा पदार्थ ‘इडली-आलू-ब्रेड-पाकोडा’ करू न पाहू. या.

मग फिरायला जाऊन येतांना मी दुधाच्या पिशव्या सोबत एक स्लाइस ब्रेड आणला.

साहित्य: एक स्लाइस ब्रेड,दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,इडली-डोशाचे तयार बॅटर (ओले पीठ) , बटाट्याच्या सारणासाठी हिरवी मिरची,आले,लसूण पाकळ्या,मीठ,जिरे पूड,कढी पत्त्यांची पाने, फोडणीसाठी हळद,हिंग,जिरे व पाकोडा तळणीसाठी तेल.

कृती : प्रथम उकडलेले दोन्ही बटाट्याची साले काढून व किसून ठेवले. पावाचे चार स्लाइस कात्रीने कापून त्यांचे प्रत्येकी चार तुकडे करून ठेवले. ४ हिरव्या मिरच्या ,आल्याचा तुकडा ,४-५ लसणाच्या पाकळ्या,थोडेसे जिरे,६-७ कढीपत्त्याची पाने व चवीनुसार मीठ या सर्वांचे मिक्सरवर वाटण करून घेतले. एका पसरट  भांड्यात इडली-डोशाचे ओले पीठ (बॅटर) काहून घेतले.

तेल चांगले तापल्यावर त्यात फोडणीसाठी हळद ,हिंग व जिरे टाकून मोहरी व जिरे तडतडूलयांवर त्यात मिक्सरवर बनवून ठेवलेले  वाटण घालून चांगले परतून घेतले. मग त्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस  घालून चांगले मिक्स करून व परतून घेतले. हे झाले बटाट्याचे पाकोड्यांसाठी बनवलेले सारण.

एव्हढी प्राथमिक तयारी झाल्यावर मग  गॅसवर एका कढईत पाकोडा तळणीसाठी तेल तापायला ठेवले.

गॅसवर तेल तापत असतांना दुसरीकडे पावाच्या स्लाईच्या तुकड्यांवर पेस्ट सारखे तयार केलेले बटाट्याचे सारण लावून वरून दूसरा पावाचा तुकडा हाताने दाबून  सँडविच सारखे आठ पिसेस बनवून घेतले.

हे करेपर्यंत कढईतले तेल चांगले तापले होते.

मग त्यात एकेक सँडविचचा पीस इडलीच्या ओल्या बॅटरमध्ये बुडवून गहेवून काढाईटल्या तापलेल्या तेळा त सोडला. असे चार सँडविचचे पीस (पाकोडे) तेळात सोडल्यावर ते सोनेरी रंगावर तळून पेपर नॅपकिनवर काढले.

पावसाळी हवेत हिरव्या चटणीसोबत हे कुरकुरीत इडली-ब्रेड-आलू पाकोडे खातांनाचा आनंद अवर्णनिय होता.  

 

 



टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search