११/२८/२०२२

ओली हळद व आंबा हळदीची भाजी (विथ ग्रीन पीज)


 यंदाच्या वर्षी मे महिन्यात ३ तारखेला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही आमच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवरील माती विरहित बागेत (GMVB) मध्ये एका २ ‘ X २ ‘ आकाराच्या वाफ्यात मेघालयातील Lokadong  प्रजातीची हळद आणि आंबे हळद लावली होती.

वेळेवर केलेले खत-पाण्यामुळे तिची जोमदार वाढ होऊन अवघ्या सात महिन्यातच तिची पाने पिवळी पडू लागल्याने आमच्या GMVB ग्रुपचे सदस्य व आमचे मित्र प्रशांत उर्फ भाई धारणे यांनी दोन दिवसांपूर्वीच हळदीची काढणी पूर्ण केली.

त्यातील काही हळद व आंबा हळद यांचे आम्ही लोणचे घातले.
शिल्लक उरलेल्या हळदीपैकी मातृ कंद बाजूला काढून पुढील वर्षी लागवडीसाठी होळी च्या राखेत ठेऊन दिलेत.
उरलेली हळद उकडून घेतली आहे व तिची मिक्सरवर हळद पावडर बनवणार आहोत.
मात्र लोणचे करून सुद्धा आंबा हळद बरीच शिल्लक राहिल्याने तिचे काय करावे असा प्रश्न आम्हाला पडल्यामुळे मी GMVB ग्रुपवर जाणकारांना सल्ला विचारलं होता.
काही सदस्यांनी या ओल्या आंबा हळदीची भाजी करा असा सल्ला दिला. पण भाज काही करतात टेक माहिती नसल्यामुळे मी रेसिपी सांगा अशी विनंती करताच २-३ सदस्यांनी रेसिपी सांगितल्यावर मी त्या वाचून त्यात काह सुधारणा करून माझ्या कंपळनेप्रमाणे माझी स्वतंत्र पंजाबी डिश असते तशा प्रकारची ग्रेव्हि असलेली बनवली आहे.
सोबत त्या भाजीचा फोटो व माझी रेसिपी सदधा देत आहे.
चार ओल्या हळदीचे कंद व चार आंबा हळदीचे कंद घेतले त्यांची सालं पूर्ण काढून किसणीवर त्यांचा किस केला.१०-१२ लसणाच्या पाकळ्या व चवीनुसार हिरव्या मिरच्या खलबत्त्यात कुटून घेतल्या. (पेस्ट करायची नाही)
मिक्सर च्या भांड्यात एका टोमॅटोच्या फोडी ,एक कांदा बारीक चिरून टाकावा.त्यात आल्याचा छोटा तुकडा आणि ५-६ काजू घातले. मिक्सर वर याची पेस्ट तयार करायची.नंतर त्यात चार टेबलस्पून दही घालून मिक्सरवर ग्रेव्हि बनवली.
आता गॅस वर कढई गरम करून त्यात ४-५ चमचे साजूक तूप गरम करून त्यात किसून ठेवलेल्या साध्या व आंबा हळदीचा कीस घालून चांगला खमंग परतून घेतला. कढई ला हळददीचा कीस चिकटून राहू नये म्हणून एकसारखा खाली वर परतत राहावा.त्यात दोन तमाल पत्र,दालचिनी,पाच ,सहा लवंग आणि २-३ काळीमिरी टाकावी.एक चमचा जिरे टाकावे.जशी हळद शिजेल तशी कढई ला चिकटत नाही. आता चिमुट भर हिंग टाकून थोडे परतून झाल्यावर कांदा,टोमॅटो,काजू व दह्याची ग्रेव्हि टाकावी. आणि थोडे परतून झाल्यावर चवी नुसार मीठ मिक्स केले.आता त्यात अर्धी वाटी मटारचे वाफावलेले दाणे टाकून थोडे परतवून गॅस बंद करून वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search