ऑफिस ऑफिस
ऑफिस म्हणजे धावपळ
पुन्हा एकदा जाहिर झाले
ऑफिस सुरू झाल्यामुळे
लपलेले चेहरे बाहेर आले
कर्मचार्यांना पाहुन कदाचित
ते ऑफिसही दचकलं असेल
जुन्या आठवणीच्या हूंदक्यानं
अहो नक्कीच आचकलं असेल
हि नव्याने सुरूवात समजून
प्रगती नव्याने वधारली जावी
काळजी आणि जबाबदारीही
अगदी चोख निभावली जावी
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
टिप्पणी पोस्ट करा