फुलून यावे दिवस पुन्हा ते,
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचे...
अन् अबोल असतानाही मी,
नयनात जाणलेले गंध प्रितीचे....!!
फुलून यावे दिवस पुन्हा ते,
तुझ्या हातात हात गुफंलेले...
अन् जगण्याच्या वाटेवरती,
प्रेमाचं हे गोड नात जुपंलेले...
फुलून यावे दिवस पुन्हा ते,
चादंण्या राती बोलत बसलेले...
वाटे लुकलुकणार् या चादंण्यात,
आपलं छोटसं गाव होत वसलेले...
फुलून यावे दिवस पुन्हा ते,
पावसाच्या सरीत चिबं भिजायचे...
वेडा स्पर्श होताच या गारव्याचा,
अलगद मला तुझ्या मिठीत घ्यायचे...!!