गंध प्रितीचा मनी कधी ना दरवळले...
पण का तुज बघता क्षणी सखे,
मन माझे वेडे आज पून्हा गंधाळले...
ना कधी कळले ना कधी वळले,
नजेरशी नजर कधी आपले जुळले...
पण का तुझ्या डोळ्यात डोहात,
मन माझे वेडे पून्हा गूतंले...
ना कधी जाणले ना कधी अनुभवले,
नाजूक तुझे ते कधी स्पर्श कोवळे....
पण का स्पर्श करता तू मला,
रोमारोमात माझ्या हर्ष फूलले...
ना कधी तुटले ना कधी सुटले,
नातं हे प्रेमाचे कधी ना उसवले...
पण का विणता विणता धागे,
तुझ्या आठवणीत मन वेडे गुफंले...!!
© स्वप्नील चटगे