शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
इतिहास
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
साईबाबा
साईबाबा
साईबाबा हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साईबाबा शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. १५ ऑक्टोबर १९१८ साली दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी मानवी देहाचा त्याग केला.
साईबाबा शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. साईबाबा पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.“सबका मालीक एक” हे साईंचे बोल होते. ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र जगाला दिला.
साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबानी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
दळणवळण
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.

संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous