१/०८/२०२०

प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्या सारखं असत




"मी मराठी माझी मराठी" च्या सर्व वाचक मंडळींना माझा नमस्कार.

कविता, लेख, photos, articles चा खजाना असलेला हा आपला हक्काचा ब्लॉग!
सुरुवातीपासून मी या ब्लॉगवर अधून मधून भटकंती करत असतो. सतत काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात यावर अनेक नव नवीन गोष्टी चालू असतात.

असाच प्रकारचा अजून एक छोटा उपक्रम सुरू झालाय, तो म्हणजे "marathishortstory.com"!
मित्रहो, प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्या सारखं असत, कोण कवितेतून व्यक्त होतं, कोण लेखातून तर कोणी विडिओ बनवून.

tik tok आणि instagram , whatsapp वरही व्यक्त होण्याचे अनेक लघुप्रकार आले आहेत.
तरी मराठीत छोट्या कथा अर्थात लघु कथा साठी हा नवीन blog सुरू करण्यात आला आहे. आपल्या सर्वाकडे अनेक गोष्टी असतात संगण्यासारख्या, त्या आपल्याच असतात अस नाही तर आपल्या आजूबाजूला देखील घडणाऱ्या असतात आणि त्यांचा अपल्यावर परिणाम होत असतो.

मित्रहो, मी "लाकूड तोड्या आणि कावळा-चिमणी या प्रकारच्या गोष्टीविषयी नाही बोलत आहे, समाजात वावरताना ज्या गोष्टीं आपण पाहतो, ऐकतो त्याबाबद्दल बोलतो आहे. समाजात काय होत आहे आणि कसा बदल होतो आहे त्याबाबद्दल अश्या कथा-गोष्टीमुळे बऱ्याच बिंदूंवर प्रकाश पडत असतो.

internet च्या युगात information चा सुसाट flow सुरू असताना,  so called "ज्ञान" वाटणाऱ्या गोष्टी आता रटाळ आणि कंटाळवाण्या झाल्या आहेत.

मला तर आजच्या आत्ताच्या कथा वाचायच्यात, आणि तुम्हाला मित्रांनो ???

मित्रहो, तुमच्या जवळ अश्या कथा-गोष्टी असतील तर आम्हाला marathishortstory@gmail.com  वर तुमच्या नावा सहित पाठवा. जर तुम्हाला तुमचा photo किव्वा इतर माहिती त्यासोबत प्रकाशित करायची असेल तर तीही पाठवू शकता. आम्ही तुमच्या कथा-गोष्टी प्रकाशित केल्यास तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर करू.
तुमच्या मित्रवर्तुळात, whatsapp, insta,fb वर्तुळात असे कोणी  story लिहणारे असतील तर त्यांना नक्की सांगा.

एक सांगायचं राहीलच.  marathishortstory.com ला भेट देत दया, कथा वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. तसेच नवीन अपडेट्स साठी  https://www.facebook.com/marathishortstories या page  वर जाऊन like  करू शकता. 

धन्यवाद मी मराठी माझी मराठी आणि सर्व वाचकहो!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search