मोठे लाल कांदे ,तिखट, मीठ चवीप्रमाणे,बेसन अंदाजे लागेल तितके,तेल तळण्यासाठी थोडीशी हळद,थोडेसे ओवा थोडीशी कोथींबीर.
कसे तयार कराल :
कांदा अगदी बारीक उभा कापून घ्यावा. आता त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० ते १५ मिनीटे बाजुला ठेवावे. त्या नंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत होई पर्यंत ताल्याव्यात.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार